Home » Hollywood » Cop At Brangelina Home

ब्रँजेलिनाच्या घरी पोलिस !

वृत्तसंस्था | Jan 07, 2013, 16:13PM IST

लॉस एंजलिस - हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्या घरी रविवारी अचानक पोलिस दाखल झाल्याने काही वेळासाठी सर्वांचीच गडबड उडाली. अँजेलिना आणि ब्रॅड यांच्या मुलांनी चुकून पॅनिक बटन दाबल्यामुळे पोलिसांची फजिती झाली.

 

हॉलिवूडच्या या लोकप्रिय जोडप्याला सहा मुले आहेत. त्यात दत्तक मुलांचाही समावेश आहे. 49 वर्षीय पिट आणि 37 वर्षीय जोली यांनी काही दिवसांपूर्वी गुपचूप विवाह उरकल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. हे जोडपे आणि त्यांचे कुटुंब पॅरॉट के भागात राहतात. मुलांच्या संगोपनासाठी 12 दायांची व्यवस्था करण्यात आली आहे.
 

Ganesh Chaturthi Photo Contest
Click for comment
 
 
 
जाहिरात
Email Print Comment