बर्फावर घसरली पॉप क्वीन
भास्कर नेटवर्क
| Jan 05, 2013, 10:10AM IST

पॉप गायिका मॅडोना आपल्या बॉयफ्रेंड आणि दोन मुलांसोबत सुटी घालवण्यासाठी स्वित्झर्लंडला गेली आहे. त्या वेळी स्कीइंग करताना ती घसरून पडली. 54 वर्षीय गायिका आपल्या मुलांसोबत नवे वर्ष साजरे करण्यासाठी गेली आहे. तिने पहिल्यांदाच बर्फावर स्कीइंग करण्याचा प्रयत्न केला. स्कीइंग करण्यासाठी ती जशी उभी राहिली तसाच तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. त्या वेळी तिचा 25 वर्षीय बॉयफ्रेंड तिच्याजवळच उभा होता. स्लीक ब्लॅक स्की जॅकेट, मॅचिंग पँट आणि हेलमेट घातलेली मॅडोना त्यावेळीही फारचं सुंदर दिसत होती.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात






