Home » Top Story » Aamir Khan To Inaugarate Satyamev Jayate Bhawan
जाहिरात

26 जानेवारीला हे काम करुन आमिर म्हणणार 'सत्यमेव जयते'

भास्कर नेटवर्क | Jan 25, 2013, 14:34PM IST
 
अभिनेता आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाचा प्रभाव आपण सगळ्यांनीच पाहिला. गेल्या तीन महिन्यांपासून आमिरला 26 जानेवारीच्या दिवशी कार्यक्रमाला हजेरी लावून सामाजिक मद्द्यावर बोलण्यासाठी असंख्य निमंत्रण मिळाले आहेत. मात्र आमिरने कोणत्याही मुद्दयावर बोलण्यास आपला नकार कळवला आहे. पण आमिरने एक निमंत्रण स्वीकारले आहे. स्त्रियांशी संबंधित मुद्द्यांवर आमिरने आपल्या कार्यक्रमातून प्रकाशझोत टाकला. स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणा-या 'स्नेहालय' या एनजीओने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमिर सहभागी होणार आहे. यासाठी तो 26 जानेवारीला अहमदनगरला जाणार आहे. 
 
'स्नेहालय' ही संस्था स्त्री प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करते. या संस्थेने आमिरचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय त्यांनी आपल्या एनजीओच्या पहिल्या संस्थेचे नाव 'सत्यमेव जयते भवन' असे ठेवण्याचे ठरवले आहे. आमिरला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तो खूपच भावूक झाला आणि त्याने या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा निर्णय घेतला. 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाचा झालेला चांगला परिणाम बघून आमिर आनंदित आहे.  
 
Click for comment
 
 
जाहिरात
Email Print Comment