Home » Top Story » Meet Kareena's Step Daughter Sara Ali Khan

पाहा सैफ अली खानची मुलगी साराची खास छायाचित्रे

भास्कर नेटवर्क | Jan 17, 2013, 16:35PM IST
1 of 17

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची थोरली कन्या सारा अली खान लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. सारा आता 18 वर्षांची आहे. मध्यंतरीच्या काळात  साराला आपल्या सिनेमात कास्ट करण्याची इच्छा काही निर्मात्यांनी अमृता सिंगकडे व्यक्त केली होती. मात्र साराची आई अमृता सिंगने स्पष्ट केले होते की, साराचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करेल. तोपर्यंत ती कुठलाही सिनेमा स्वीकारणार नाही. त्यामुळे पुढील चार पाच वर्षे तरी सारा सिनेमांमध्ये झळकणार नाही असं दिसतंय.

 

आता सारा सिनेमांमध्ये दिसणार की नाही हे तर नंतरच स्पष्ट होईल. मात्र सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावून सारा चर्चेत आहे. सैफ आणि करीनाच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात सारा आवर्जुन हजर राहिली.

 

आज आम्ही तुम्हाला सारा अली खानची बालपणीपासून ते आत्तापर्यंतची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत...

 
() Click for comment
 
जाहिरात
Email Print Comment