...आणि प्रियंका चोप्रा चक्क संवाद विसरली
दिव्य मराठी वेब टीम | Jan 18, 2013, 09:09AM IST

बॉलिवूड अभिनेत्रींमधील लेडी परफेक्शनिस्ट म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा चित्रीकरणादरम्यान चक्क संवादच विसरली, असे जर तुम्हाला सांगितले तर कदाचित त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु ही गोष्ट खरी आहे. ‘जंजीर’ या रिमेक सिनेमाचे चित्रीकरणा सध्या सुरू असून त्यात संजय दत्त आणि प्रियंका चोप्रावर काही दृश्ये चित्रित केली जात होती, परंतु समोर संजूबाबासारखा अभिनेता असल्याचे पाहून प्रियंका तिचे सर्व संवाद विसरून गेली. परिणामी हे दृश्य वारंवार चित्रित करावे लागले. एक दोन नव्हे, तर तब्बल 17 रिटेक झाल्यानंतर हा शॉट कुठे ओके झाला. संजय दत्तला समोर पाहून प्रियंका नर्व्हस झाली होती. त्यामुळे संवाद म्हणताना तिची फजिती होत होती. हे पाहून संजूसह सहकार्यांनी तिची फिरकी घेतली.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात






