दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग दुबईत सीक्रेट डेटवर गेल्याच्या बातम्या ताज्या असतानाच आता दोघांच्या या नवीन छायाचित्रामुळे आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. दुबईच्या एका नाईट क्लबमध्ये रणवीर दीपिकाला चक्क किस करताना दिसला.
गेल्या काही दिवसांपासून रणवीर आणि दीपिका डेटिंग करत असल्याची चर्चा होती. मात्र रणवीर आणि दीपिकाने या बातम्या केवळ अफवाच असल्याचे म्हटले होते. पण आता त्यांच्या या नवीन छायाचित्रामुळे त्यांच्या डेटिंगच्या बातम्या अफवा नसल्याचेच स्पष्ट होत आहे.