मंगळागौर हा श्रावण महिन्यातील एक खास स्त्रियांचा सण. 'उंच माझा झोका' मालिकेतील रमाही लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी करत आहे. मंगळागौरीसाठी रमा खास तिच्या माहेरी आली आहे. मैत्रीणी आणि आईबरोबर रमाने आनंदात मंगळागौरीची पूजा केली शिवाय मंगळागौरीचे खास खेळही खेळली. आता मंगळागौर म्हटली की उखाणा हा आलाच. मैत्रीणींनी आग्रह केल्यानंतर तिने मस्त उखाणाही घेतला.
झी मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या 'उंच माझा झोका' या मालिकेत रमाची पहिली मंगळागौर थाटात साजरी झाली.
पाहा रमाच्या पहिल्या मंगळागौरीची ही खास छायाचित्रे
सौ. झी मराठी