रिझोना वाळवंटातील या सुंदर वाळूच्या पर्वतांना ‘द वेव’ म्हटले जाते. लाल रंगाच्या दगडावर पांढर्या रंगाच्या लाटांसारख्या डिझाइनमुळे त्यांना हे नाव देण्यात आले आहे. डोंगरावरच्या या डिझाइनला 19 कोटी वर्षे झाली आहेत. तज्ज्ञांच्या मते वाळू चिकटल्यामुळे या डोंगरावर अशा आडव्या आणि उभ्या रेषा बनल्या आहेत. निसर्गाच्या या अद्भुत सौंदर्याची देखरेख चांगल्या प्रकारे करण्यात येते. डोंगराची छायाचित्रे घेण्यासाठी येथे परवानगी घ्यावी लागते. अँरिझोना आणि उटाहच्या सीमेवर कोयोटे बट्समध्ये या रेषा बनल्या आहेत. या रेषांमध्ये सर्वात जास्त लांब रेष 19 मीटर रुंद आणि 36 मीटर लांब आहे.