अभिनेता चिरंजीवी यांचा मुलगा के. राम चरन तेजा गुरुवारी लग्नगाठीत अडकला. हैद्राबादजवळील मोईनाबाद फार्महाऊसवर हा शानदार लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. नवदाम्प्त्याला शुभेच्छा देण्यासाठी राजकारण्यांबरोबरच चित्रपटसृष्टीतल्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
आंध्र प्रदेशचे राज्यपाल ई.एस.एल. नरसिम्हन, तामिळनाडूचे राज्यपाल के. रोसैय्या, राज्याचे मुख्यमंत्री एन. किरण कुमार रेड्डी, माजी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी वर-वधूला शुभेच्छा दिल्या. यांच्यासह बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन, तामिळ सुपरस्टार रजनीकांत, अम्बरीश, श्रीदेवी, बोनी कपूर, तब्बू, जयाप्रदा हे देखील हजर होते.
या लग्नसोहळ्याची खास झलक पाहा या छायाचित्रांमध्ये
फोटा साभार : www.gulte.com