बिपाशा बसूला हवा माधवनसारखा नवरा !
ईशा राजदान | Jan 16, 2012, 15:39PM IST

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूवर तिच्या 'जोडी ब्रेकर्स' या आगामी चित्रपटाचा सह अभिनेता आर.माधवनचा चांगला प्रभाव पडला आहे, असे दिसतेय.
'जोडी ब्रेकर्स'मधील भूमिका साकारणारा माधवन आणि प्रत्यक्षातील माधवन या दोघांमधील गुणांचा संगम असलेला नवरा मिळावा अशी बिपाशाची इच्छा आहे.
सध्या बिपाशा 'रिलेशनशीप' या शब्दालाच कंटाळली आहे. तिला सतत तिच्या आणि जॉनच्या ब्रेकअपविषयी विचारण्यात येते. जॉनविषयी कुणी काहीही विचारले की ती चिडते. मात्र, कुणी माधवनसंबंधित विषय जरी काढला तरी बिपाशा उत्साहाने बोलू लागते. त्याचे कौतुक करताना बिपाशा थकत नाही.
बिपाशाच्या या मतावर माधवन काय प्रतिक्रिया देतो याची वाट पाहावी लागेल.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





