Home » Top Story » Esha Deol And Bharat Takhatani Get Married In June

हेमामालिनीला सापडला ईशाच्या लग्नाचा मुहूर्त

दिव्य मराठी वेब टीम | Mar 27, 2012, 15:05PM IST

मुंबई - अभिनेत्री हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांची लाडकी लेक ईशा देओल उद्योगपती भरत तख्तानीबरोबर लवकरच लग्नगाठीत अडकणार आहे. यावर्षीच्या फेब्रुवारीत ईशा आणि भरतचा साखरपूडा झाला होता. साखरपुड्यानंतर हे दोघे लग्नगाठीत कधी अडकणार याची उत्सुकता सगळ्यांना होती. आता हेमामालिनीने सगळ्यांची उत्सुकता संपवली आहे. कारण हेमामालिनीला ईशाच्या लग्नासाठी मुहूर्त गवसला आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हेमामालिनी यांनी सांगितले की, येत्या जूनमध्ये ईशा आणि भरत लग्नगाठीत अडकतील. पावसाळ्यात लग्नाचा मुहूर्त का काढला, असा प्रश्न हेमामालिनी यांना विचारण्यात आला, त्यावर त्यांनी उत्तर दिले की, पाऊसही माझ्या मुलीला आशिर्वाद देईल.

धार्मिक विधींनी हा लग्नसोहळा पार पडणार असल्याचे हेमामालिनी यांनी सांगितले.BalGopal Photo Contest
Click for comment
 
 
 
जाहिरात
Email Print Comment