लेडी गागा रुपेरी पडद्यावर साकारणार अॅमी वाइन हाऊस
वृत्तसंस्था
| Aug 07, 2011, 03:13AM IST

लंडन - हॉलीवूडची शोकांतिका ठरलेली गायिका अॅमी वाइनहाऊसवर आता चित्रपट येऊ घातला आहे. अॅमीची भूमिका लेडी गागा करण्याची शक्यता असून त्याविषयी बोलणी सुरू आहे.
अॅमीच्या अकाली मृत्यूचे दु:ख जगभरातील तिच्या चाहत्यांना वाटू लागले आहे. या परिस्थितीत अॅमीच्या आयुष्याला रुपेरी पडद्यावर आणण्याचा घाट हॉलीवूडच्या चित्रपट निर्मात्यांनी घातला आहे. तिच्या व्यक्तिरेखेसाठी लेडी गागा एकदम योग्य असल्याचे त्यांना वाटू लागले आहे. लेडी गागा ही अॅमीला आपला आदर्श मानत असे. त्यामुळे ती मोठ्या पडद्यावर स्वत:ला अॅमीच्या रूपात पाहण्यात धन्यता मानते. ती अॅमीची गाणीही सादर करेल. तिचा लूक व दृष्टिकोनही तसाच आहे. त्याचबरोबर गागाला चित्रपटात अशा पद्धतीने डेब्यू करण्याची संधीही मिळणार आहे, असे हॉलीवूडमधील जाणकार सांगतात.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात




