जाहिरात
Home >> Bollywood >> Star Interview >> Star Interview Of Aayushmaan Khurana On Vicky Doonar

विकी डोनर म्हणतोय, पैसे घेऊन स्पर्म डोनेट करण्यात गैर ते काय ?

दिव्य मराठी वेब टीम | Apr 02, 2012, 17:40PM IST
 
 


स्पर्म डोनेट करण्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे, शिवाय तरुण याला व्यवसाय म्हणूनही स्विकारु शकतात, हे म्हणणे आहे 'विकी डोनर' या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणा-या आयुष्यमानचे. सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आयुष्यमानने नुकतीच दैनिक भास्कर डॉट कॉमशी बातचित केली.

जॉन अब्राहमच्या प्रॉडक्शन हाऊसने तयार केलेल्या या सिनेमाविषयी आयुष्यमानने सांगितले की, हा सिनेमा फन आणि एन्टरटेन्मेंटबरोबरच प्रेक्षकांना स्पर्म डोनेशनसारख्या विषयावर मेसेजही देईल.

स्पर्म डोनेटरची भूमिका करणे अवघड नव्हते -

आयुष्यमानने सांगितले की, याआधी टेलिव्हिजन शो 'रोडीज'मध्ये स्पर्म डोनेट केले होते. त्यामुळे ही भूमिका करणे फार अवघड नव्हते. स्पर्म डोनेट करणे ही साधी गोष्ट आहे. यावर समाजात उघडपणे बोलणे व्हायला पाहिजे. या भूमिकेसाठी ऑडीशन झाली नसल्याचे आयुष्यमानने सांगितले.

स्ट्रगल करुन इथवर पोहोचलो -

बॉलिवूडच्या एन्ट्रीबद्दल आयुष्यमानने सांगितले की, याआधी माझ्याकडे भरपूर स्क्रीप्ट्स आल्या होत्या. मात्र मी एका चांगल्या कन्सेप्टच्या शोधात होतो. 'विकी डोनर'ची कन्सेप्ट खूप चांगली आहे आणि प्रेक्षकांना हा सिनेमा नक्की आवडेल.

आयुष्यमानने पुढे सांगितले की, मी कोणत्याही बड्या स्टारचा मुलगा नाही किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझा कुणी गॉडफादरही नाही. स्वबळावर इथवर पोहोचलो असल्याचे आयुष्यमानने सांगितले.

जॉन मोठ्या भावासारखा -

जॉन मोठ्या भावासारखा असल्याचे आयुष्यमानने यावेळी सांगितले. जॉनकडून अभिनयाचे धडे घेतल्याचेही आयुष्यमानने सांगितले.

निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह भूमिका करण्याची इच्छा -

बॉलिवूडमध्ये एकसारखी भूमिका आयुष्यमानला करायची नाही. निगेटिव्ह आण पॉझिटिव्ह भूमिका करण्याची इच्छा आयुष्यमानने व्यक्त केली आहे.

अमिताभ बच्चन आदर्श -

आयुष्यमान बॉलिवूडमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांना आपला आदर्श मानतो. 




आयुष्यमानच्या मुलाखतीचा खास भाग पाहा, या व्हिडिओमध्ये














 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
5 + 4

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment