जाहिरात
 
 
 

‘आकाश’ आता ‘मेड इन इंडिया’च्या दिशेने

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 00:30(08/02/12)
 
 
 

बंगळुरू- स्वस्त आणि मस्त असलेल्या ‘आकाश’ टॅब्लेट पीसीची संपूर्ण निर्मिती भारतात करण्याचा विचार आहे. त्याचबरोबर या टॅब्लेटच्या उत्पादनातही वैविध्य आणण्याचा मानस माहिती तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल यांनी व्यक्त केला आहे. 

भारतातच आकाश टॅब्लेट पीसीचा संपूर्ण विकास करण्यासाठी इको सिस्टिम विकसित करण्याची योजना आहे. यामुळे संशोधन आणि विकास संस्था, विकासक आणि इलेक्ट्रॉनिकचे उत्पादन करणाºयांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षाही सिबल यांनी इंडियन सेमीकंडक्टर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या एका परिसंवादात बोलताना व्यक्त केली. 

देशामध्ये 22 कोटी आकाश टॅब्लेट पीसीची गरज असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अगोदरच सांगितले आहे. त्यामुळे या टॅब्लेट पीसीचे उत्पादन करण्यासाठी अन्य कंपन्यांनाही संधी मिळावी यासाठी नव्याने निविदा मागवण्यात येणार आहे. ‘आकाश’ची सध्या निर्मिती करीत असलेल्या डेटाविंड या कंपनीलादेखील उत्पादन करण्याची संधी मिळणार आहे.  आकाश टॅब्लेटमधील प्रोसेसरसह अन्य काही सुट्या भागांची आयात बाहेरून करण्यात येत आहे. त्यामुळे नवीन आकाश टॅब्लेटची निर्मिती करण्यासाठी मागवण्यात येणाºया आगामी निविदांमध्ये ‘मेड इन इंडिया’ ही अट असेल का,  असे विचारले असता सिबल म्हणाले की,  ‘आकाश’ची 100 टक्के निर्मिती स्थानिक पातळीवर व्हावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे ‘आकाश’च्या या प्रवासात आपल्या प्रत्येकाला कसे सहभागी होता येईल यावर प्रत्येकाने विचार करावा. 

आकाश टॅब्लेट पीसी आणखी स्वस्त किमतीत उपलब्ध व्हावा तसेच तो अधिकाधिक स्वदेशी बनावा यासाठी या प्रकल्पात आणखी तीन आयआयटी संस्थांना सहभागी करून घेण्याचा सरकारचा विचार आहे. पहिल्या ‘आकाश’च्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देणाºया आयआयटी राजस्थानबरोबरच आयआयटी मुंबई, आयआयटी मद्रास, आयआयटी कानपूर यांनाही प्रकल्पात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. 

सध्याच्या आकाश टॅब्लेट पीसीचा वेग 300 मेगाहर्ट्झ आहे. परंतु नवीन सुधारित टॅब्लेटचा वेग 800 मेगाहर्ट्झ असेल. विशेष म्हणजे उत्पादनातील वैविध्यामुळे ‘आकाश’ची किंमतही कमी होऊन ती 1500 रुपयांवर येईल. 

आंध्र प्रदेश सरकारने 10 हजार आकाश टॅब्लेट खरेदी करण्याचा प्रस्ताव सिब्बल यांच्याकडे पाठवला आहे. हे टॅब्लेट राज्यातील विद्यापीठ, अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांना देण्याचा निर्णय आंध्र प्रदेश सरकारने घेतला आहे. मुंबई विद्यापीठानेही 25 हजार टॅब्लेटची मागणी केली असून 90 महाविद्यालये आणि खात्यांकडून ही मागणी आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी ‘आकाश’ला गवसणी मोफत 

विद्यार्थ्यांना ‘ई- लर्निंग’चा अनुभव सहजपणे घेता यावा यासाठी देशभरातील शिक्षण संस्थांना स्वस्तातला ‘आकाश’ टॅब्लेट मोफत देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार विचार करीत आहे. तसे झाल्यास देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना ‘ई-शिक्षण’ मिळावे या दृष्टीने विद्यार्थ्यांना आकाश टॅब्लेटचे वितरण मोफत करण्याचा विचार सरकार करीत असल्याचे सिब्बल यांनी सांगितले. ‘आकाश’ टॅब्लेटची किंमत 1 हजार 500 रुपये असून त्यासाठी 750 रुपयांची सरकारी सवलत  मिळणार आहे. उर्वरित 750 रुपये खर्चाचा भार संबंधित शिक्षण संस्थांनी उचलावयाचा असल्याने विद्यार्थ्यांना हे टॅब्लेट जवळपास मोफत उपलब्ध होणार असल्याचेही सिब्बल यांनी या वेळी स्पष्ट केले.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
2 + 9

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment