जाहिरात
Home » Business » Auto » Aulto Sale Reached Til 20 Lacks

अल्टोने गाठला विक्रीचा 20 लाखांचा टप्पा

वृत्तसंस्था | Jun 16, 2012, 00:48AM IST
अल्टोने गाठला विक्रीचा 20 लाखांचा टप्पा

नवी दिल्ली - अल्टो या प्रवासी कारने विक्रीचा 20 लाखांचा आकडा ओलांडल्याचे देशातील प्रवासी कार निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकीने म्हटले आहे. बाजारात दाखल झाल्यानंतर 11 वर्षे आणि 9 महिन्यांत अल्टोने हा मानाचा आकडा पार केला आहे. 

देशातील बाजारपेठेत गेली सात वर्षे सर्वाधिक विक्रीचा मान मिळवणा -या अल्टोने 20 लाख ग्राहकांची पसंती मिळवत आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला असल्याचे मारुती-सुझुकीने म्हटले आहे.गेल्या दोन वर्षांत जागतिक बाजारातही अल्टोने बेस्ट कार सेलिंगचा मान मिळवल्याचा दावा

कंपनीने केला आहे.अल्टोची इंधन किफायतशीरता, आकर्षक आणि आटोपशीर आकार, उत्तम गतिशीलता आणि कमी किंमत या बाबींमुळे अल्टोने ग्राहकांची मने जिंकली असल्याचे मत मारुती-सुझुकीचे सीओओ मयंक परीक यांनी व्यक्त केले. तपापूर्वी जून 2000 मध्ये अल्टो पहिल्यांदा बाजारात आली. त्यानंतर आठ वर्षे आणि तीन महिन्यांत अल्टोने विक्रीत 10 लाखांचा टप्पा ओलांडला. आता जून 2012 मध्ये विक्रीतील 20 लाखांचा टप्पा ओलांडून अल्टोने स्वत:चाच विक्रम मोडला आहे. 10 लाखांपासून 20 लाखांपर्यंत विक्रीचा आकडा अल्टोने केवळ तीन वर्षे आणि सहा महिन्यांत गाठला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर अल्टोने 2010-11  या आर्थिक वर्षात तीन लाखांहून अधिक विक्रीचा आकडा पार केला आहे.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
1 + 2

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment