जाहिरात
 
 
 

शक्तिशाली दुचाकींच्या स्पर्धेत आता उतरणार बजाज

 
Source: बिझनेस ब्युरो   |   Last Updated 03:54(04/02/12)
 
 
 

नवी दिल्ली - गेल्या आठवड्यात बजाजने 200 सीसीची पल्सर बाजारात आणली आहे. आगामी काळात अशाच अधिक शक्तिशाली मोटारसायकल बाजारात आणण्याची बजाजची योजना आहे. आता जेनेक्स 200 एनएस ही नवी मोटारसायकल बाजारात आणण्याची तयारी बजाजने केली आहे. येत्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच मार्चमध्ये ही मोटारसायकल बाजारात आणण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीची आता 200 ते 700 सीसीच्या मोटारसायकली बाजारात आणण्याची योजना आहे.

बजाजने नव्या पल्सरमध्ये अनेक तांत्रिक बदल केले आहेत. नव्या पल्सरमध्ये ट्रिपल स्पार्क पल्गचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या पल्सरची इंधन क्षमता चांगली झाली आहे. जुन्या पल्सरपेक्षा नव्या पल्सरसाठी कमी प्रमाणात इंधन लागणार आहे. कंपनीने अजून या नव्या पल्सरची किंमत जाहीर केलेली नाही. मात्र या पल्सरची किंमत 1 लाखांच्या आसपास असेल असे सूत्रांनी स्पष्ट केले. या पल्सरमध्ये लिक्विड कुलिंग तंत्राचा वापर करण्यात आला असून, या मोटारसायकलला सहा गिअर असतील. ही नवी पल्सर जुन्या पल्सरपेक्षा अधिक आकर्षक आणि आरामदायी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. बजाजची नवी पल्सर यामाहा आर 15 आणि होंडा सीबीआर 250 ला चांगली टक्कर देईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.

पल्सरला आणखी सजवणार - बजाजचा सर्वाधिक विकला जाणारा ब्रँड अशी ख्याती असलेल्या पल्सरवरच बजाजने लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. आगामी काळात 350 सीसीची पल्सर बाजारात आण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी बजाज  केटीएम बाइकचे सहकार्य घेणार आहे. 2014-15 पर्यंत अधिक शक्तिशाली इंजिन असणा-या पल्सर आणण्याची जोरदार तयारी बजाजने केली आहे. कंपनी सध्या केवळ हलक्या स्वरूपाच्या दुचाकी बनवते, तर होंडा, यामाहा आणि सुझुकी या कंपन्यांनी शक्तिशाली दुचाकी निर्मितीत चांगले नाव मिळवले आहे. त्यांना टक्कर देण्याची तयारी आता बजाजने केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
10 + 7

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment