Home » Business » Gadget » Cheapest-Mobile-Phone

रिलायन्‍सचा हा फोन मिळतोय फक्‍त 374 रूपयांना

दिव्‍यमराठी वेब टीम | Jun 01, 2012, 12:53PM IST
रिलायन्‍सचा हा फोन मिळतोय फक्‍त 374 रूपयांना

जर तुम्‍ही रिलायन्‍सचा स्‍वस्‍त मोबाईल खरेदी करण्‍याचा विचार करत असाल तर तुमच्‍यासाठी एक खूशखबर आहे. रिलायन्‍स खास आपल्‍या ग्राहकांसाठी 400 पेक्षा कमी किंमतीचा मोबाईल हँडसेट सादर करीत आहे. हा मेड इन चायनाचा फोन असेल, असे जर तुम्‍हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. रिलायन्‍स ब्रँड नावाने तो युजरला देण्‍यात येणार आहे.

फक्‍त 374 रूपयांना मिळणा-या या फोनची खरी किंमत 1999 रूपये आहे. परंतु, डील्‍स अँन्‍ड यू ऑनलाईन शॉपिंग साईट रिलायन्‍सच्‍या या फोनवर 1626 ची सूट देत आहे. रिलायन्‍सच्‍या क्‍लासिक 7610 या फोनची एमआरपी सुमारे 2 हजार रूपये आहे. ही ऑफर फक्‍त ठराविक काळासाठीच आहे. याशिवाय या साईटवर इतर अनेकही ऑफर देण्‍यात येत आहे.

रिलायन्‍स क्‍लासिक 7610 चे प्रमूख वैशिष्‍टये

एलसीडी डिस्‍प्‍ले, ड्युल बँड जीएसएम रेडिओ, 1.5 स्‍क्रीन, एफएम प्‍लेबॅक, 280 तास स्‍टँडबाय टाईम, 4.5 तासाचा टॉक टाईम

Email Print
0
Comment