Home » Business » Share Market » Facebook Losing Revenue From Advertisement

जाहिरातीच्‍या मैदानावर फेसबुक झाले क्लिन बोल्‍ड?

दिव्य मराठी नेटवर्क | May 18, 2012, 20:19PM IST
जाहिरातीच्‍या मैदानावर फेसबुक झाले क्लिन बोल्‍ड?

जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुक जाहिरातीतून मिळणा-या उत्‍पन्‍नाच्‍या बाबतीत मागे पडत चालली आहे. मोठमोठया कंपन्‍याही फेसबुकवर जाहिरात देताना विचार करताना दिसून येत आहे. जनरल मोटर्स यातील सर्वात मोठे उदाहरण आहे. या कंपनीने फेसबुकला पेड जाहिरात न देण्‍याचा निर्णय घेतला आहे. उल्‍लेखनीय म्‍हणजे जनरल मोटर्स ही कंपनी अमेरिकेमध्‍ये सर्वात जास्‍त जाहिरात देणारी कंपनी म्‍हणून ओळखली जाते. पैसे देऊन जाहिरात करून जर कंपनीला फायदा होत नाही तर सरळ फेसबुकवर कंपनीचे पेज तयार करून मोफत जाहिरात करणे कधीही चांगले, असे कंपनीचे म्‍हणणे आहे.

त्‍यामुळे 100 कोटी युजर्स असलेल्‍या या सोशल नेटवर्किंग साईट्सवरदेखील लोक शंका उपस्थित करत आहेत. एवढ मोठा युजर बेस असताना देखील कंपनीला जाहिरातीच्‍या बाबतीत त्‍यांना त्‍याचा योग्‍य वापर करता येत नसल्‍याचे, या क्षेत्रातील तज्‍ज्ञांचे म्‍हणणे आहे. त्‍यामुळे येत्‍या काळात कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागणार आहे.

फेसबुकला जास्‍तीच्‍या जाहिराती मिळवण्‍यासाठी आक्रमक धोरणे राबववी लागतील, असे जे.डब्‍लू.टी के वर्ल्‍ड वाईड डिजिटलचे या जाहिरात एजन्‍सीचे संचालक डेव्हिड ईस्‍टमन यांनी म्‍हटले आहे. कोणत्‍या प्रकारचे युजर्स कोणत्‍या जाहिरातीवर क्लिक करतात याची माहिती कंपनीला जाहिरातदारांना द्यावी लागेल. प्रत्‍येक कंपनीला फेसबुकवर आपल्‍या उत्‍पादनाची जाहिरात करायची आहे. पंरतु त्‍यांना हे माहीत नाही की, याचा त्‍यांना किती फायदा होईल. अशात फेसबुकने व्‍यवसाय वाढवण्‍यासाठी युजर्सची संपूर्ण माहिती दिली पाहिजे. त्‍याचा फायदा त्‍यांना जाहिरातीपासून मिळणा-या उत्‍पन्‍नात वाढ झालेल्‍यात दिसून येईल.

एखाद्या पेजवर 15 टक्‍के लोक जाहिरात पाहिल्‍यास त्‍यातील 75 टक्‍के लोक लाईक बटनला क्लिक करणारे लोक ती जाहिरात जरूर पाहतील, असे फेसबुकचे म्‍हणण्‍ो आहे.

जानेवारी-मार्च या तिमाहीमध्‍ये कंपनीच्‍या शुद्ध नफ्यात 12 टक्‍क्‍यांची घसरणीची नोंद दिसून आली आहे. कंपनीला जाहिरातीपासून मिळणा-या उत्‍पन्‍नही 7.5 टक्‍के इतके कमी झाली आहे. फेसबुकच्‍या जानेवरी-मार्चच्‍या तिमाहीमध्‍ये शुद्ध नफ्यात 12 टक्‍के घसरण झाली आहे.

फेसबुकच्‍या 2009, 2010 आणि 2011च्‍या तिस-या आणि चौथ्‍या तिमाहीमध्‍ये जाहिरातीतून प्राप्‍त होणा-या उत्‍पन्‍न अनुक्रमे 64,46 आणि 18 टक्‍के इतके राहिले आहे.

Email Print
0
Comment