Home » Business » Business Special » Gold Rate Decrease Continuously

सोने 30 हजाराखाली, तीन दिवसांत 1 हजार रूपयांची घट

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 20, 2013, 20:34PM IST
सोने 30 हजाराखाली, तीन दिवसांत 1 हजार रूपयांची घट

सरकारी प्रयत्‍नांमुळे आणि आरबीआयच्‍या सक्‍त सूचनांमुळे सोन्‍याचे मूल्‍य 30 हजाराच्‍या खाली आले आहे. सोन्‍याच्‍या भावात आज (बुधवारी) सर्वाधिक 620 रूपये कमी होऊन ते 29895 रूपयांवर पोहोचले. तर मुंबईमध्‍ये 365 रूपयांनी घसरण होऊन 29955 रूपयांवर भाव स्थिर झाला. जयपूरमध्‍ये 180 रूपयांनी कमी होऊन तो 29970 रूपये, दिल्‍लीमध्‍ये 200 रूपये कमी होऊन 30000 रूपये तर चेन्‍नईमध्‍ये 190 रूपयांनी घसरण होऊन भाव 30040 वर पोहोचला. अनेक ठिकाणी तर गेल्‍या तीन दिवसांत सोन्‍याच्‍या दरात एक हजार रूपयांची घसरण झाली.

आंतरराष्‍ट्रीय बाजारात सोन्‍याचे दर घटून 1668 डॉलर औंसवर पोहोचले. दुसरीकडे चांदीच्‍या किंमतीतही 350 रूपयांनी घट झाली. चांदीचे दर 59140 रूपयांवरून 58790 रूपयांवर पोहोचले.

उल्‍लेखनीय म्‍हणजे, लग्‍न समारंभाच्‍या दिवसांमध्‍ये सोन्‍याची मागणी घटली आहे. दरामध्‍ये घसरण होत असल्‍याचे पाहून लोकांनी घाबरून सोने विक्रीस काढण्‍यास सुरूवात केली आहे.

Email Print
0
Comment