जाहिरात
 
 
 

ह्युंदाईची ई-ऑन आता एलपीजीवर

 
Source: बिझनेस ब्युरो   |   Last Updated 23:25(06/02/12)
 
 
 

नवी दिल्ली - मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणा-या आल्टोला टक्कर देण्यासाठी मैदानात उतरवण्यात आलेली ह्युंदाई ई-ऑन आता एलपीजीवर आणण्याचा कंपनीचा विचार आहे. ई-ऑन बाजारात आल्यापासूनच तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता ई-ऑन एलपीजीवर आणल्यानंतर मागणी आणखी वाढेल, असे मत कंपनीच्या सूत्रांनी व्यक्त केले. 

 छोट्या कारच्या क्षेत्रात आता जबरदस्त स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपन्या आता आपल्या मॉडेलमध्ये ग्राहकोपयोगी बदल करीत आहेत. किंमत कमी ठेवण्याबरोबरच वैविध्यपूर्ण फीचर्स देण्यावर कंपन्यांचा अधिक भर आहे. ह्युंंदाईनेही यात मागे न राहता नव्याने बाजारात आणलेल्या इ-ऑनला आता एलपीजी किट देण्याची योजना आखली आहे. इ-ऑनची दिल्लीतील एक्स-शो रूम किंमत 2.98 लाख रुपये आहे. इ-ऑनचे मायलेज 21.1 किलोमीटर प्रतिलिटर आहे. इ-ऑनला आता कंपनीने बसवलेले एलपीजी किट असणार आहे. यात 32 लिटर पेट्रोल तर 34 लिटरचे एलपीजी टँक असतील. सध्याच्या डिलाइट प्लस, इरा प्लस आणि मॅग्ना प्लस या सर्वांत या सुविधेसह अनेक नवे फीचर्स असणार आहेत. इरा प्लसची एक्स-शो किंमत 3.12 लाख  असून त्यात फ्रंट पॉवर विंडो तसेच सेंट्रल लॉकिंग सिस्टीम ही सुविधा देण्यात आली आहे. मॅग्नामध्ये यूएसबी इंटरफेससह डबल-डीन ऑडिओ सिस्टीम देण्यात आली आहे. ह्युंदाईने स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे बदल केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
10 + 7

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment