जाहिरात
Home » Business » Gadget » Idia-Smart-Phone

आयडियाची कल्पना प्रत्यक्षात, स्वस्त थ्री-जी स्मार्टफोन

बिझनेस ब्युरो | Nov 25, 2011, 06:52AM IST

नवी दिल्ली -  मोबाइल सेवा पुरवणारी आघाडीची आयडिया सेल्युलर कंपनी आता हँडसेट बाजारात उतरली आहे. कंपनीने थ्री-जी स्मार्टफोनचे दोन मॉडेल्स बाजारात आणले आहेत.  टू-जी तसेच थ्री-जी अशा दोन्ही सेवांसाठी या हँडसेटचा वापर करता येणार आहे. या हँडसेटच्या एंट्री मॉडेलची किंमत 5850 रुपये आहे. मात्र, कंपनीकडून या हँडसेटवर स्पेशल डाटा देण्यात येणार आहे. त्यामुळे या हँडसेटची किंमत 2609 रुपये झाली आहे. 

त्याशिवाय आयडियाच्या थ्री-जी हँडसेटच्या अप्पर मॉडेलची किंमत 7992 रुपये आहे. या मॉडेलबरोबर कंपनी   स्पेशल थ्री-जी डाटा आॅफर करत आहे. यामुळे याची किंमत 4751 रुपयांवर आली आहे. 

हे हँडसेट सादर करताना आयडिया सेल्युलरचे  व्यवस्थापकीय संचालक हिमांशू कपानिया यांनी सांगितले की, थ्री-जी सेवेसाठी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची कंपनीची  योजना आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून थ्री-जी सेवेचे कव्हरेज वाढवण्यात येणार आहे. हँडसेट निर्मितीसाठी कंपनीने ह्युवई  तसेच झेडटीएस यांच्याबरोबर करार केला आहे. मात्र स्मार्टफोन हँडसेटच्या विक्रीला उत्पन्नाचा मोठा हिस्सा बनवला जाणार नाही, असे कपानिया यांनी स्पष्ट केले. यामुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढीस लागणार आहे.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
9 + 4

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment