जाहिरात
Home >> Business >> Share Market >> Know All About Ipo Related Issues

जाणून घ्‍या आयपीओ म्‍हणजे काय, कशी करावी यात गुंतवणूक?

दिव्‍य मराठी वेब टीम | May 18, 2012, 20:12PM IST
 
 


फेसबुकच्‍या आयपीओवरून बाजारात वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. अंदाज लावणा-यांमध्‍ये अनेकजणांना आयपीओबाबत चांगली माहिती आहे, तर काहींना यातील माहितीच नाही. अशात आम्‍ही तुम्‍हाला आयपीओशी निगडीत सर्व माहिती देण्‍याचा प्रयत्‍न करीत आहोत.

साधारणपणे गुंतवणूकदार आयपीओमध्‍ये गुंतवणूक करणे म्‍हणजे कंपनीमध्‍ये गुंतवणूक करणे असे मानतात. परंतु, जाणकार व्‍यक्ती असे मानत नाहीत. कंपनीत गुंतवणूक कायम न ठेवणा-या गुंतवणूकदारांनी सूचीबद्ध होण्‍यापूर्वीच आपले शेअर विकले पाहिजेत.

जाणून घ्‍या काय आहे आयपीओ?

इनिशियल पब्लिक ऑफर म्‍हणजे आयपीओ. यासाठी कंपन्‍या शेअर बाजारमध्‍ये स्‍वत:ला लिस्‍टेड करून शेअरमध्‍ये गुंतवणूकदारांना विकण्‍यासाठी प्रस्‍ताव आणतात. शेअर बाजारात लिस्‍टेड झाल्‍यामुळे कंपनीच्‍या बाबतीत विस्‍तृत माहिती सार्वजनिक होते. सूचीबद्ध झाल्‍यानंतरच कंपनीचे अधिग्रहण किंवा दुस-या कंपनीत वर्ग होता येते.

आयपीओ का आणतात कंपन्‍या?

कंपन्‍या विस्‍तार करण्‍यासाठी इक्विटी वाढवण्‍यासाठी आणि आपल्‍या इतर गरजा पूर्ण करण्‍यासाठी आयपीओ बाजारात आणतात. कर्ज न घेणे आणि पैशांची गरज भासल्‍यास कंपन्‍या आयपीची मदत घेतात.

कशी ठरते किंमत

आयपीओची किंमत दोन पद्धतीने निश्चित होते. एकतर प्राईस ब्रँड निश्चित करून गुंतवणूकदारांकडून अर्ज मागवणे, ज्‍यावर कंपनीला सर्वात जास्‍त अर्ज मिळतात. त्‍यावरच कंपनी आपल्‍या शेअरची किंमत निश्चित करते.

दुसरा फिक्‍सड प्राइस इश्‍यूने, यामध्‍ये शेअरचे भाव आधीपासूनच निश्चित केलेले असतात. यामध्‍ये गुंतवणूकदाराला शेअरमध्‍ये गुंतवणूक करायचे की नाही याचा निर्णय घ्‍यावा लागतो.

आयपीओ आणि एफपीओमध्‍ये फरक

एफपीओ (फॉलोऑन पब्लिक ऑफर) यामध्‍ये पहिल्‍यांदा सूचीबद्ध कंपन्‍या आपले काही शेअर विकतात. तर आयपीओमध्‍ये कंपन्‍या शेअर बाजारमध्‍ये स्‍वत:ला लिस्‍टेड करून गुंतवणूकदारांना प्रस्‍ताव देतात.

आयपीओशी निगडीत आणखी काही

1. क्‍वॉलिफाईड इंस्‍टीट्यूशन बायर्स (क्‍यूआयबी) कडे कंपनीच्‍या बाबतीत विस्‍तृत माहिती असते. तर रिटेल बायर्स कंपनीच्‍या बाबतीत जास्‍तीची माहिती मिळवू शकत नाहीत.

2. 1999 पासूनचे सर्व आयपीओंचे 50 ते 60 टक्‍के शेअर क्‍यूआयबीसाठी राखीव ठेवले जातात. क्‍यूआयबी आयपीओला जसा प्रतिसाद देतात त्‍याला ओपन बुक बिल्डिंग सिस्‍टम म्‍हटले जाते.

3. क्‍यूआयबी एखाद्या कंपनीचे शेअरसाठी जेवढी किंमत निश्चित करते त्‍याला कट ऑफ ऑप्‍शन म्‍हणतात.

4. ज्‍यामध्‍ये प्रायव्‍हेट इक्विटी कंपनीचे वेंचर कॅपिटल एक वर्षांपेक्षा कमी वेळेसाठी गुंतवणूक केलेली असते, त्‍यामध्‍ये रिटेल गुंतवणूकदारांनी अशा आयपीओमध्‍ये गुंतवणूक करू नये.

5. रिटेल गुंतवणूकदारांना क्‍यूआयबीवर डोळे बंद ठेवून विश्‍वास ठेवू नये. कंपनीचे प्रमोटर, व्‍यवसाय, टर्नओवरच्‍या बाबतीत माहिती मिळवण्‍याचा प्रयत्‍न केला पाहिजे.









 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
4 + 6

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment