जाहिरात
Home » Business » Auto » Lamborgin Enter In India, Adventender Lp 700-4

लॅम्बॉर्गिनीचा भारतात प्रवेश, अ‍ॅव्हेंटेडर एलपी 700-4 दाखल

प्रतिनिधी | Jan 26, 2013, 04:35AM IST
लॅम्बॉर्गिनीचा भारतात प्रवेश, अ‍ॅव्हेंटेडर एलपी 700-4 दाखल

मुंबई  - ‘लॅम्बॉर्गिनी इंडिया’ या कंपनीने लॅम्बोर्गिनी अ‍ॅव्हेंटेडर एलपी 700-4 रोडस्टर  ओपन टॉप लक्झरी सुपर स्पोर्टस   मोटर बाजारात दाखल केली आहे. जगभरात 1300 मोटारींची विक्री केल्यानंतर आता भारतीय ग्राहकांसाठी अ‍ॅव्हेंटेडरची ही नवी आवृत्ती सादर केली असून ती गाडी चालवण्याचा अप्रतिम अनुभव आणि स्पोर्टस  कारमधील उत्तम मॉडेल यांचे उत्कृष्ट संतुलन साधते.  

टपावरच्या  भागामुळे ही मोटार लगेच ओळखता येते. वरच्या भागात काढून ठेवता येण्याजोग्या छपरापासून इंजिन हूडपर्यंत नव्याने डिझाइन केलेल्या जिओमॅट्रिक लाइन्समुळे ही मोटार आणखी आकर्षक झाली आहे.  लक्झरी मोटारींबरोबरच आता सुपर कार्सदेखील भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागल्या आहेत.  त्यामुळे भारतीय बाजारपेठेत सुपर कार्सना चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा ऑ टोमोबिली लॅम्बॉर्गिनी या कंपनीच्या दक्षिण पूर्व आशिया आणि प्रशांत विभागाचे विक्री व्यवस्थापक आंद्रेया बाल्दी यांनी व्यक्त केली.  कंपनीने गेल्या वर्षात जागतिक बाजारपेठेत 2083, तर भारतीय बाजारपेठेत 17 मोटारींची विक्री केली.  दोन तुकड्यांतील छप्पर आरटीएम व फोर्ज्ड कम्पोझिट अशा टेक्नालॉजींचा वापर करून पूर्णत: कार्बन फायबरचे बनवलेले आहे. या टेक्नालॉजींमुळे अप्रतिम कामगिरी आणि प्रत्येक भाग 6 किलोपेक्षाही कमी वजनाचा इतका हलका असला तरी मजबूतपणाची खात्री  मिळते.
 
4.77 कोटींची कार
*हलक्या  अ‍ॅल्युमिनिअममध्ये  तयार केलेले हे रिम अन्य रिमच्या तुलनेत गाडीचे वजन 10  किलोने कमी करतात.
*केवळ 3 सेकंदांत तिचा वेग शून्यावरून प्रति तास 100 किमीपर्यंत वाढवता येऊ शकतो.  
*कमाल वेग प्रति तास 350 किमी इतका आहे.  
*किंमत : 4.77 कोटी रुपये  (एक्स शोरूम, दिल्ली)
 

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
7 + 10

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment