या 'विशेष' प्रवाशांना भारतीय रेल्वे देणार खास भेट
बिझनेस ब्युरो
| Apr 13, 2012, 15:19PM IST

भारतीय रेल्वे आपल्या विशेष प्रवाशांसाठी खास सेवा देण्याची तयारी करत आहे. रेल्वेमध्ये प्रवास करणा-या अपंगांना आता त्रास सहन करण्याची गरज भासणार नाही. रेल्वेकडून एक खास प्रकारची लिफ्ट तयार करण्यात येत असून याद्वारे त्या व्यक्तीस थेट कोचमध्ये बसता येईल. या लिफ्टमुळे अपंग प्रवाशांची चांगलीच सोय होणार आहे. सध्या रेल्वेच्या संशोधन विभाग आणि प्रारूप विभागाकडून याच्यावर अभ्यास करण्यात येत आहे.
भारतीय रेल्वेने यापूर्वीच अपंग प्रवाशांसाठी एका विशेष कोचची सेवा सुरू केली आहे. या विशेष कोचला एसएलआरडी म्हटले जाते. रेल्वे सध्या ज्या प्रकारची लिफ्ट बनवत आहे, त्यामुळे अपंगांना कोचमध्ये चढण्यास व उतरण्यास सुलभता येईल. यासेवेबरोबरच रेल्वे अपंगांसाठी इतरही अनेक सेवा लवकरच सुरू करणार आहे.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





