Home » Business » Auto » Mahindra Launches Two Motor Bikes

‘महिंद्रा’ने लॉंच केल्‍या सेंच्युरो आणि पँटेरो

प्रतिनिधी | Jan 05, 2013, 22:36PM IST
1 of 2

मुंबई- महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा कंपनीने सेंच्युरो व पॅँटेरो या दुचाकींसह पुन्हा एकदा मोटारसायकल बाजारात प्रवेश केला आहे. शंभर सीसी इंजिन असलेल्या या दोन्ही मोटारसायकलींच्या किमती किंवा त्यांची विक्री कधी सुरू होणार याबाबतचा तपशील मात्र कंपनीने दिलेला नाही.


महिंद्राने सप्टेंबर 2010 मध्ये स्टॅलिओ बाइक सादर केली होती. मात्र गिअरबॉक्समध्ये अडचण निर्माण झाल्यानंतर ती 2011 मध्ये बाजारातून काढून घेतली. त्यानंतर दोन वर्षांनी कंपनी पुन्हा मोटारसायकल बाजारात प्रवेश करीत आहे.


कंपनीने स्वत: विकसित केलेल्या ‘मायक्रोचिप इग्निटेड 5 कर्व्ह (एमसीआय-5)’ इंजिनाच्या मदतीने धावणा-या सेंच्युरो-पॅँटेरो दोन्ही वाहनांचे डिझाइन कंपनीच्या पुण्यातील आरअँडडी केंद्रात विक्रमी 18 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. पॅँटोरो काही आठवड्यांत तर त्यानंतरच्या काही आठवड्यांनी सेंट्युरो बाजारात येणार असल्याचे महिंद्रा टू व्हीलरचे अध्यक्ष अनूप माथूर यांनी सांगितले.

पँटेरोची वैशिष्ट्ये :

* वाहतूक कोंडी तसेच खराब रस्त्यावरून सहजपणे चालवण्यासाठी स्लीक स्टायलिंग व लो टर्निंग रेडियसची सुविधा
* डिजिटल डॅशबोर्ड-स्पीडोमीटर, फ्युएल गॉग, टेकोमीटर व घड्याळ
* कमी उंचीची व लांब सीट (774 मि.मी.)
* फ्लेमिंग डिकेलसहित एकमेव, स्लीक स्टायलिंग चालकाच्या अधिक सुरक्षेसाठी एलईडी टेल व एलईडी पायलट लॅम्प

Email Print
0
Comment