जाहिरात
 
 
 

‘मारूती’च्या विक्रीने गाठला कोटीचा पल्ला

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 01:42(10/02/12)
 
 
 

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लि.ने देशांतर्गत बाजारपेठेत एक कोटीवी कार विकण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मारुतीच्या मानेसर येथील कारखान्यात तयार झालेल्या स्विफ्ट मॉडेलला एक कोटीव्या कारचा मान मिळाला. लाल रंगाची ही स्विफ्ट व्हीएक्सआय कार गुरुवारी कोइम्बतूरला पाठवण्यात आली. 

मारुती सुझुकीने डिसेंबर 1983 मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत आपली पहिली कार आणली होती. फेब्रुवारी 2006 मध्ये 50 लाखावी कार विकली होती. गेल्या सहा वर्षांत मारुतीने 50 लाख कार विकून एक इतिहास रचला आहे. एक कोटी वाहन विकणारी मारुती ही देशांतर्गत बाजारातील एकमेव कार उत्पादक कंपनी आहे. 

मारुती 800 हे मॉडेल पहिल्यांदा कंपनीने बाजारात आणले. पुढे मारुती 800 आणि ओम्नी व्हॅन ही वाहनांनी बाजारपेठेवर कब्जा केला. कंपनीचे लोकप्रिय मॉडेल ठरलेली आल्टो सलग सात वर्षांपासून सर्वाधिक विकली जाणारी कार म्हणून ओळखली जाते. सध्यादेखील तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. कंपनीच्या वॅगन आर आणि स्विफ्ट मॉडेलचेही भारतीय ग्राहकांना चांगलेच आकर्षण आहे.  व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ शिंजो नाकानिशी यांनी या यशाचा आनंद साजरा करताना म्हटले आहे की, मारुतीने नेहमीच ग्राहकांच्या पसंतीला प्राधान्य देऊन नववने मॉडेल बाजारात आणण्यावर भर दिला आहे. 

एसएक्स फोरची सेलिब्रेशन आवृत्ती - मारुतीने एक कोटीवी कार विक्रीच्या आनंदात सेडान गटातील एसएक्स फोर मॉडेलची सेलिब्रेशन आवृत्ती काढली आहे.

वैशिष्ट्ये काय : नवे सीट फॅब्रिक, क्रोम इनसाइड डोअर हँडल, क्रोम एसी लुव्हर्स, आर्म रेस्टवर क्यूबिक प्रिंटिंग, सेलिब्रेशन फ्लोअर मॅट आणि पिलोज.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
8 + 8

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment