होय, मोबाईल बनविणारी भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सने भारतात सगळ्यात स्वस्त ड्यूएल स्क्रीन टचस्क्रीन मोबाईल सादर केला आहे. ज्याची किमत ५००० रुपयेपेक्षा कमी ठेवली आहे. तसेच या मोबाईलमध्ये दोन सीम एकाच वेळी चालू शकतील. याची स्क्रीन ३.२ इंच आहे. तर याचा कॅमेरा ३ मेगापिक्सल आहे.
कंपनीने एक्स ६५० नावाने मोबाईल बाजारात आणला आहे तसेच तो बार टाइपमध्ये मोडतो. हा मोबाईल फक्त २ जी टेक्नोलॉजीला सपोर्ट करतो. यात थ्री सपोर्ट फंक्शन नाही. या कंपनीचे टचस्क्रीन मोबाईल इतर कंपनीपेक्षा चांगले आहेत. यात मोंशन सेंसर लावण्यात आला आहे. त्यात गेम इंस्टॉल असेल.
व्हिडिओ रेकॉर्डिंग, ओपेरा मिनी, ब्राऊजर, जावा, एफएम, ब्लूटूथ, जीपीआरएस आदी सुविधा आहेत. यात ८ जीबीएवढी मेमरी आहे. बॅटरी बॅकअप उत्तम आहे. त्यानुसार २४० तास स्टॅडबाय स्थितीत राहू शकते. तर ५ तास इतके वेळ बोलू शकता.