भारत मजबूत स्थितीत, पत मानांकन घसरणार नाही: स्टॅन्डर्ड अॅन्ड पुअर
वृत्तसंस्था
| Aug 16, 2011, 13:38PM IST

नवी दिल्ली- अमेरिकेचे पत मानांकन कमी केलेल्या स्टॅन्डर्ड अॅन्ड पुअरने भारताच्या पत मानांकनाला काही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण देशातील कमकुवत आर्थिक नीतीमुळे भविष्यात त्याचा धोका निर्माण होऊ शकतो असेही त्यांनी म्हटले आहे.
भारताच्या पत मानांकनाला कुठलाही धोका नसल्याचे स्टॅन्डर्ड अॅन्ड पुअरचे विश्लेषक काहिरा ओगावा यांनी सांगितले. अमेरिकेचे मानांकन घसरण्याचा भारतावर कुठलाही परिणाम होणार नाही. भारताला सध्या ‘बीबीबी’ मानांकन आहे.
आंतरराष्ट्रीय मानांकन देणा-या या एजन्सीने अमेरिकेचे मानांकन कमी केले होते. त्याचा परिणाम जगातील बाजारपेठेवर पडला होता. यामध्ये गुंतवणूकदारांना नुकसान सोसावे लागले होते.
भारतातील महसूली तूटीचा आणि वाढत्या चलन दराचा आर्थिक विकासावर वाईट परिणाम पडू शकतो. त्यामुळे भारताचे मानांकन घसरू शकते, असेही ते म्हणाले.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात




