जाहिरात
Home >> Business >> Personal Finance >> Payment Not Same In India

जगभरात वेतनातील सर्वाधिक तफावत भारतदेशी!

वृत्तसंस्था | Jul 03, 2012, 01:15AM IST
 
 


नवी दिल्ली - सन 2020 पर्यंत आर्थिक महासत्ता होण्याची सुखस्वप्ने पाहत असलेल्या भारतातील विरोधाभास खाड्कन डोळे उघडणारा आहे. आजही देशातील तब्बल 30 कोटी लोकसंख्या दररोज एक डॉलरपेक्षा छदाम्ही अधिक कमवू शकत नाही. दुसरीकडे देशातील राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सीईओंच्या वेतनांचे आकडे कोट्यवधी रुपयांना जाऊन टेकले आहेत. मनुष्यबळ क्षेत्रातील जागतिक सल्लागार संस्था ऑन हेविटच्या अध्ययनात या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) आणि पहिली नोकरी करत असलेल्या पदवीधराला मिळणा-या वेतनात सर्वाधिक अंतर भारतात आहे. या दोघांच्या वेतनात चक्क 675 पटींचा फरक आहे. या विरोधाभासात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. आजची महासत्ता अमेरिका वेतनात 423 पटींच्या फरकासह दुस-या क्रमांकावर आहे. याबाबतीच चीनचे स्थान बरेच खाली आहे. तेथे कर्मचा-यांच्या फरकात 268 पटींचा फरक होता.

  ऑन हेविटचे प्रमुख (कॉम्पोनसेशन प्रॅक्टिस) आनंदरूप घोष यांनी सांगितले की, वेतनातील फरकाकडे बघता भारत जगातील सर्वात मोठा भांडवलवादी देश म्हणून समोर येतो. ऑन हेविटच्या अध्ययतनात म्हटले आहे की, आर्थिक उदारीकरणाचे धोरण अवलंबवल्यानंतर दोन दशकांत भारतात कॉर्पोरेट क्षेत्राने अभूतपूर्व गतीने विकास साधला.

 दरम्यान, भारती समूह, टाटा, बिर्ला यांच्यासारख्या विशाल व्यवसाय असलेल्या ‘बिझनेस जायंट्स’सह लहान मोठ्या कंपन्या आणि व्यावसायिक समूह आपल्या जागतिक प्रतिस्पर्ध्यांना पुरून उरण्यासाठी प्रतिभावंतांच्या नेतृत्वाखालील टीमला आपल्याकडे खेचत आहेत. यासाठी ते वाटेल ती किंमत मोजतात. भारती समूहाचे संचालक (एचआर) इंदर वालिया यांनी  सांगितले की, व्यापारी समूहांचा गाडा चालवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रतिभावंत, अनुभवी आणि कुशल अधिका-यांची मोठी गरज असते. यामुळे रग्गड दाम मोजून त्यांना आपल्याकडे नोकरी द्यावी लागते.



चेअरमनचे वेतन घटले, सीईओंचे वाढले



आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी विप्रोचे   चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अझीम प्रेमजी यांच्या वेतनात गत वित्तवर्षाच्या तुलनेत कपात झाली आहे. त्यांना आता 1.9 कोटी रुपये वार्षिक वेतन मिळते. याच कालावधीत समूहाच्या आयटी व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टी.के. कुरियन यांचे वेतन पॅकेज पाच पटींनी वाढून 4.5 कोटी रुपयांवर गेले आहे. माजी सीईओ सुरेश वासवानी आणि गिरीश एस. परांजपे यांना अधिक वेतन पॅकेज मिळत होते. 2010-11मध्ये वासवानी यांचे वेतन पॅकेज 10.2 कोटी रुपये, तर परांजपे 8.9 कोटी रुपये होते. विप्रोचे सीएफओ सुरेश सेनापती यांचेही वेतन पॅकेज घटले आहे.



> 2010-11मधील प्रेमजी यांचे वेतन 2.8 कोटींवरून 2011-12मध्ये 1.9 कोटी झाले.

> कंपनीच्या सीईओंचे एकूण वेतन पॅकेज 27.5 कोटींवरून 8.7 कोटी रुपये राहिले.

> विप्रोच्या कर्मचा-यांचे एकूण वेतन वाढून 15,400 कोटी रुपयांवर गेले.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
4 + 7

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment