जाहिरात
 
 
 

रिलायन्सच्या समभागांवर संक्रांत; उत्पादन घटण्याचा अंदाज

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 01:01(14/01/12)
 
 
 

मुंबई: मॉर्गन स्टॅनले या आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज एजन्सीने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उत्पादन आणि नफ्यात घट येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी रिलायन्सच्या समभागांची जोरदार विक्री केली. परिणामी रिलायन्सच्या शेअर्समध्ये 0.75 टक्के घसरण झाली. दिवसअखेर रिलायन्सचे शेअर्स 732.05 रुपये या पातळीवर बंद झाले.  

सकाळच्या सत्रात 1.8 टक्के वाढीसह रिलायन्सचे शेअर्स 750.60 या पातळीवर होते. मात्र, रिलायन्सचा नफा आणि उत्पादन घटणार असे वृत्त धडकताच मुंबई शेअर बाजारात रिलायन्सच्या शेअर्सची जोरदार विक्री झाली. या समभागांत 1.24 टक्क्यांची घट होऊन ते 728.35 या पातळीपर्यंत खाली आले. सत्राच्या अखेरीस यात सुधारणा झाली आणि दिवसअखेर रिलायन्सचे शेअर्स 732.05 या पातळीवर बंद झाले. रिलासन्सच्या कृष्णा-गोदावरी खोºयातील केजी-डी 6 या तेलपट्ट्यातून उत्पादन कमी होणार असल्याचे मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालात म्हटले आहे. त्याचा परिणाम रिलायन्सच्या शेअर्सवर दिसून आला. दुसरीकडे कैर्न इंडियाच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज या अहवालात असल्याने कैर्न इंडियाच्या समभागात तेजी आली. दिवसअखेर कैर्न इंडियाचे समभाग 2.51 टक्के तेजीसह 336.30 रुपये या पातळीवर बंद झाले. मॉर्गन स्टॅनलेने तेल आणि वायू क्षेत्रात घट येणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. एचपीसीएल आणि बीपीसीएल या कंपन्यांवर याचा परिणाम होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पाच राज्यांतील निवडणुका झाल्यानंतर इंधनाच्या किमती पुन्हा वाढतील.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
1 + 9

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment