जाहिरात
 
 
 

सॅमसंगने आणला सर्वात स्वस्त टॅब्लेट

 
Source: बिझनेस ब्युरो   |   Last Updated 23:30(15/02/12)
 
 
 

नवी दिल्ली - सध्या टॅब्लेटचा बाजार तेजीत आहे. यात आपले नाणे खणकवण्यासाठी एकाहून एक स्वस्त टॅब्लेट बाजारात आणण्यासाठी कंपन्यात चुरस लागली आहे. सॅमसंगने यात एक पाऊल पुढे टाकत टॅब-2 बाजारात आणला आहे. सात इंच लांबीच्या या टॅब्लेटची किमत आहे 17226 रूपये!

सॅमसंग टॅब -2 पुढील महिन्यात जागतिक पातळीवर बाजारात दाखल होणार आहे तर एप्रिल महिन्यात तो बारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. भारतात स्वस्त टॅब्लेटची बाजारपेठ गतीने वाढत आहे. आकाश टॅब्लेट बाजारात आल्यानंतर टॅब्लेटची क्रेझ अधिक वाढणार आहे. आकाशमध्ये अनेक कमतरता असल्याचे उघड झाले आहे. त्याचा फायदा आता इतर कंपन्या उचलत आहेत. भारतात सॅमसंग टॅब-2 वाय-फाय आणि वाय-फाय प्लस थ्रीजी  स्वरूपात उपलब्ध होणार आहे. याचे वाय-फाय व्हर्जन स्वस्त असणार आहे. यात टॅबमद्ये ड्युएल-कोअर एक गेगाहर्टझ क्षमतेचे प्रोसेसर आहे.

हे टॅब्लेट 10.16 मिलीमीटर लांबीचे आहे. टॅब-2 चे वजन 340 ग्रॅम आहे. स्टण्डबाय मोडवर टॅब-2 ची बॅटरी 39 तासापर्यंत कार्यक्षम राहू शकते. याशिवाय सॅमसंग टॅब-2 मध्ये ब्ल्यूटूथ, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट आणि ड्युएल कॅमेरा अशा सुविधा आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
5 + 8

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment