जाहिरात
Home >> Business >> Share Market >> Sensex Today

सेन्सेक्सची गटांगळी

वृत्तसंस्था | Apr 25, 2012, 23:43PM IST
 
 


मुंबई - स्टँडर्ड अँड पुअर्सने भारताचे मानांकन घटवल्याचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर झाला. सेन्सेक्समध्ये 56 अंकांची घट होऊन तो 17,151.29 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 20.65 अंकांच्या घसरणीसह 5236.10 बंद झाला.

बाजारातील पडझडीचा फटका क्षत्रीय निर्देशांकांना बसला. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.55 टक्के, तर   स्मॉलकॅप निर्देशांकात 0.53 टक्के घट दिसून आली. आयटी निर्देशांक 1.48 टक्के, रिअ‍ॅल्टी 1.33 टक्के, पॉवर 1.28 टक्के अशी घसरण झाली. सेन्सेक्समधील हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात आलेल्या तेजीमुळे सेन्सेक्सच्या पडझडीला काही प्रमाणात  लगाम बसला.

भेल, गेल इंडिया, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, ओएनजीसी, स्टेट बँक  ऑफ इंडिया, सन फार्मा आणि टाटा कन्सल्टन्सी या समभागांना मात्र घसरणीचा फटका बसला. विप्रोने गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग केल्याचा फटका या समभागांना बसला. विप्रोचे समभाग 7.29 टक्के घसरणीसह 410.15 रुपये या पातळीवर बंद झाला.   एस अँड पीने मानांकन घटवल्यानंतर अर्थमंत्र्यांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले. त्यामुळे गुंतवणूकदारांचा धीर वाढला व खरेदी वाढली. त्यामुळे अखेरच्या सत्रात बाजारात खरेदीचा जोर वाढला.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
8 + 4

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment