जाहिरात
 
 
 

'व्हॅलेंटाइन डे'साठी येणार हा खास मोबाईल

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 15:39(28/01/12)
 
 
 

जर तुम्ही व्हॅलेंटाइनसाठी आपल्या जवळच्या मित्राला किंवा खास व्यक्तीला काय भेट द्यावे, असा विचार करीत असाल तर, आपल्या एक जबरदस्त पर्याय यंदाच्या वर्षी असणार आहे. मात्र ही भेट किंवा गिफ्ट खरेदी करण्यासाठी तुम्हाला जपानला जावे लागेल. कारण व्हॅलेंटाइन डेसाठी खास असा मोबाईल लॉंच करण्यात येणार आहे.

या मोबाईलचे खास वैशिष्टये हे आहे की, तो संपूर्ण चॉकलेटने बनविला आहे. चॉकलेट थीमच्या आधारावर हा फोन मर्यादित स्वरुपात बनविले आहेत. या मोबाईलच्या मागे थ्री डी (त्रिमिती) आकाराचे मेल्टिंग चॉकलेट ब्लॉक बनविले गेले आहेत. तसेच मोबाईलच्या समोरील बाजूला एक खास स्क्रीन ठेवण्यात आली आहे. त्याला पाहून असे वाटते की फोनवर चॉकलेट तुकडे ठेवण्यात आले आहेत.

याशिवाय या मोबाईलमध्ये इतर मोबाईलप्रमाणे सुविधा दिल्या आहेत. त्याला ३.४ इंचचा क्यूएचडी डिस्पले लावला आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा कॅमेरा लावण्यात आला आहे. हा मोबाईल व्हॅलेंटाइन डे दिवशी बाजारात उतरविला जाणार आहे. असे मोबाईल केवळ ५० हजार बनविले जाणार आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
4 + 2

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment