Home » Divya Marathi Special » Amazing Websites For Remember Of Various Passwords

AMAZING WEBSITES: पासवर्ड लक्षात ठेवण्‍यासाठी उपयुक्‍त

दिव्‍य मराठी वेब टीम | Feb 22, 2013, 12:31PM IST
AMAZING WEBSITES: पासवर्ड लक्षात ठेवण्‍यासाठी उपयुक्‍त

आज प्रत्‍येकाकडे अनेक प्रकारचे पासवर्ड आहेत. ई-मेल आयडी, फेसबुक आणि ट्विटरसारखे अकाऊंट सामान्‍य बाब झाली आहे. पण यांचे पासवर्ड लक्षात ठेवणे ही सर्वात मोठी समस्‍या आहे. अशावेळी लास्‍टपास ही वेबसाईट तुम्‍हाला मदतीची ठरते. पासवर्ड लक्षात ठेवणे आणि वापरावेळी आठवण्‍यासाठी जेवढा वेळ खर्च होतो. त्‍यापेक्षा ही वेबसाईट वापरणे चांगला पर्याय ठरू शकतो असा दावा या वेबसाईट निर्मात्‍यांचा आहे.

वेबसाईटवर अनेक पर्याय देण्‍यात आले आहेत. पहिला पर्याय आहे मास्‍टर पासवर्डचा. यात आपण सर्व अकाऊंटसाठी एकाच मास्‍टर पासवर्डचा वापर करू शकता. दुसरा पर्याय आहे ऑटोमॅटिक फॉर्म भरणे. हा पर्याय निवडून तुम्‍ही योग्‍य आणि सुरक्षित पद्धतीने फॉर्म भरू शकता. तिसरा पर्याय आहे वन क्लिक लॉगइन, ज्‍याच्‍या मदतीने माऊसवर एक क्लिक करून तुम्‍ही अनेक अकाऊंट ओपन करू शकता. चौथा पर्याय आहे प्रोटक्‍ट डाटा. याच्‍या मदतीने तुम्‍ही सर्व डाटा इनक्रिप्‍ट करू शकता.

Email Print
0
Comment