जाहिरात
Home » Divya Marathi Special » Four Decad Rest After Now All On Routin

चार दशके विश्रांती; आता पुन्हा रुळावर

मनोज अपरेजा | Jan 07, 2013, 05:08AM IST
चार दशके विश्रांती; आता पुन्हा रुळावर

 चंदिगड - गेल्या 41 वर्षांपासून सिमल्याच्या वर्कशॉपमध्ये उभे असलेले वाफेचे इंजिन कालका सिमला मार्गावर पुन्हा धावणार आहे. 1905 मध्ये सर्वप्रथम धावलेल्या या इंजिनाचे ऐतिहासिक महत्त्व आणि विदेशी पर्यटकांकडून होत असलेली मागणी पाहता, हे इंजिन पुन्हा रुळावर उतरणार आहे. यापूर्वीही रेल्वे विभागाने हे इंजिन चालवण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. गेल्या वर्षी हे इंजिन चालू करण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला. आता ते धावण्यास सज्ज आहे.

40 आसने; भाडे 1 लाख
या इंजिनाला दोन डबे जोडले जातील. पहिल्या डब्यात 22 व दुस - डब्यात 18 आसने असतील. पर्यटकांना या गाडीचे गु्रप बुकिंग करता येईल. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील एका संस्थेने 17 जानेवारीसाठी या गाडीचे बुकिंग केले आहे. गाडीचे भाडे 1 लाख 9 हजार रुपये आकारण्यात आले आहे.  स्ट्रेलिया, इंग्लंडमधील पर्यटकही या गाडीची चौकशी करत असल्याचे आयआरसीटीसीने सांगितले.

ही गाडी पर्र्यटकांना निसर्गसौंदयाचे दर्शन घडवेल. पर्यटक मध्येच गाडी थांबवून एखाद्या स्थळाचा आनंद घेऊ शकतील. यासह प्रवाशांसाठी असलेल्या अन्य सुविधांचा विचार करता हे भाडे आकारले जाणार आहे.
108 वर्षे जुने आहे वाफेवरचे इंजिन
1905 मध्ये इंग्रजांनी सर्वप्रथम चालवले
1971 पासून सिमला वर्कशॉपमध्ये

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
2 + 7

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment