जाहिरात
Home » Divya Marathi Special » Kujbuj : Only Re 'name'

कुजबुज : फक्त ‘नामा’त अंतर

धनंजय लांबे, समाधान पोरे, धनंजय एकबोटे | Feb 18, 2013, 02:00AM IST
1 of 3


नामांतर लढ्यानंतर श्रेय घेण्यासाठी सारेच पुढे आले. मात्र, एक नामांतर झाले तर त्याचे श्रेय आठवलेंनाच जाणार हे नक्की. मनसेने शिवसेनेत विलीन व्हावे, असा परखड सल्ला महायुतीतील नेते रामदास आठवले यांनी दिला. पाठोपाठ लगेचच राज ठाकरे यांना कार्याध्यक्षपद मिळवून देण्याविषयी उद्धव यांना सुचवू, असे जाहीर केले. आठवले यांना कुणी फारसे सिरियसली घेत नाही, परंतु त्यांची मागणी मात्र जोर धरू लागली आहे. तसेही फक्त नाव वेगळे सोडले तर मनसे व शिवसेनेत फारसा फरक नाहीच. म्हणजे फक्त नामातच अंतर आहे. आता हेच अंतर कमी व्हावे यासाठी अवघा मराठी माणूस कार्यरत असताना आठवलेही कार्यरत झालेत. (तेही मराठीच आहेत की ) मात्र राज आलेच तर त्यांना कुठले पद देण्याविषयी विचार केला जाईल, हे विधान जरा अतिशयोक्तीचेच वाटले. मात्र, म्हणतात ना राजकारणात काहीही घडू शकते. तसे भविष्यात घडल्यास व आठवले म्हणतात त्याप्रमाणे कार्याध्यक्षपदी राज ठाकारे यांना बसवल्यास बाळासाहेबांनंतर रामदास आठवले यांचा तर आदेश चालत नाही ना, अशी शंका मात्र येण्यास जागा राहील व या   नामांतराचे श्रेय कदाचित पूर्णपणे रामदासजींना देण्यास कुणाचीच हरकत नसावी.

 

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
4 + 1

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment