Home » Divya Marathi Special » Life Management Tips For Becoming Superior

एखाद्या गोष्टीत पारंगत होईपर्यंत सराव करत राहा

दिव्‍य मराठी | Jan 06, 2013, 02:52AM IST
एखाद्या गोष्टीत पारंगत होईपर्यंत सराव करत राहा

एखादी गोष्टीची केवळ आशा केल्याने ती मिळणे कठीण जाते. आयुष्यात बदल घडवणाºया गोष्टी मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी पुढील पद्धती वापरून पाहू शकता..
सकाळी उठल्यावर स्वत:ला विचारा की, मला पाहिजे तसे घडत आहे का? अनेक दिवस याचे उत्तर ‘नाही’ असेच येईल. असे केल्यास कठीण निर्णय घेणे सोपे होते.
पुढे पाऊल टाकल्याने चांगले परिणाम मिळू शकतात. मोठ्या स्वप्नांची छोट्या छोट्या ध्येयांमध्ये विभागणी करा आणि ते मिळवण्याचा प्रयत्न सुरू करा.
एखादी गोष्ट कशी मिळवायची याची योग्य पद्धत कळेपर्यंत ती गोष्ट मिळत नाही. असे केल्याने तुम्ही तुमच्यातील त्रुटींवर नियंत्रण मिळवू शकता.
एखाद्या गोष्टीत पारंगत होईपर्यंत तिचा सराव करत राहा. त्यामुळे यश मिळवणे खूप सोपे होईल.
जे महत्त्व देतात त्याच लोकांसोबत नेहमी राहा.
काम आणि खासगी आयुष्यात समतोल
साधा. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी सहजपणे मिळवता येऊ शकतील.

Email Print
0
Comment