Home » Divya Marathi Special » New Year Resolution

नव्या वर्षात पुढीलपैकी कोणताही संकल्प करा

दिव्‍य मराठी | Jan 06, 2013, 02:45AM IST
नव्या वर्षात पुढीलपैकी कोणताही संकल्प करा

नव्या वर्षात कोणते ध्येय गाठायचे किंवा कोणता संकल्प करायचा हा विचार अजूनही सुरू असेल तर पुढीलपैकी एक संकल्प करू शकता -
- गोष्टींविषयी विचार करत बसण्यापेक्षा एक पाऊल पुढे जा. त्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल.
- तुमच्यात सर्वोत्कृष्ट बनण्याची पात्रता आहे. त्यामुळे स्वत:वर विश्वास ठेवा.
- आयुष्य सुंदर बनवण्याचा विचार करा. त्यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक बदल घडतील.
- ध्येय गाठणे सोपे समजू नका. ते सोपे असते तर आतापर्यंत तुम्ही तिथवर पोहोचला असता.
- ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाहीत त्यांचा स्वीकार करा. ज्या गोष्टींपासून तुम्ही दूर जाऊ पाहता त्या गोष्टी तुमच्या जास्त जवळ येतात.
- जे घडले ते विसरून जा. जुन्या गोष्टींची आठवण काढून आजच्या आनंदात विरजण टाकू नका.
- कामात नावीन्य किंवा सृजनशीलता आणण्यासाठी विश्रांती घ्या. त्यामुळे चांगले परिणाम मिळतील.
- तुम्हाला पसंत करणारे लोक नेहमी तुमचे निरीक्षण करत असतात. त्यामुळे प्रत्येक शब्द जपून वापरा.
- नाती चांगली टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही चांगले असणे आवश्यक आहे. त्यामुळे नाती सुंदर बनवण्याची जबाबदारी घ्या.

 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment