Home » Divya Marathi Special » Who Donate Blood, Ngo Provide Pilgrimage For Donor

रक्तदान करणा-यांना तीर्थयात्रा मोफत

पूनमचंद बिष्णोई | Feb 17, 2013, 04:31AM IST
रक्तदान करणा-यांना तीर्थयात्रा मोफत

जोधपूर- रक्तदानाबाबत समाजात जागरूकता वाढवण्यासाठी मारवाड मुस्लिम एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी एक अनोखी मोहीम राबवते. ही संस्था दरवर्षी एका रक्तदात्याला तीर्थयात्रा घडवते. लॉटरी पद्धतीने या नशीबवान भाविकाची निवड केली जाते. या लॉटरीमध्ये जर मुस्लिम रक्तदात्याचे नाव निघाले तर त्यास मक्का-मदिनाच्या उमराह यात्रेला पाठवले जाते.

हिंदू, शीख किंवा ख्रिश्चन रक्तदात्याचे नाव निघाले तर त्याच्या इच्छेनुसार तीर्थयात्रा घडवली जाते. संपूर्ण तीर्थयात्रेचा प्रत्यक्ष खर्च संस्था करते किंवा तेवढी रक्कम देते. या वर्षी जोधपूरच्या पाल लिंक रोड मरुधरनगर येथील मोहंमद शफिक खान आणि त्यांचे कुटुंबीय मक्का-मदिनाच्या उमराह यात्रेवर जाऊ शकणार आहेत. एकाचे प्राण वाचवण्यासाठी केलेले रक्तदान अशाप्रकारे उमराह यात्रेची इच्छा पूर्ण करेल, असे स्वप्नातही वाटले नसल्याचे शफिक यांनी सांगितले.
गेल्या वर्षी या यात्रेसाठी भोपालगडनजीक आसोपचे महेंद्रकुमार यांचे नाव निघाले होते.

Email Print
0
Comment