जाहिरात
 
 
 

ढेकणांच्या विधवा आणि मख्खीचूस शेटजी

 
Source: दिव्य मराठी नेटवर्क   |   Last Updated 08:45(20/02/12)
 
 
 

वीरेंद्रभाई शेटजी यांच्या घरी खूप ढेकूण झाले होते. त्यांनी ढेकूण मारून देणा-या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. ढे. कु. मार्ले नावाचा एक तरुण त्यांना सापडला, जो या कामात तरबेज होता. शेटजीने त्याला बोलावून सांगितले की, तू जर एकूणएक ढेकूण मारलेस तर मी तुला 10 रुपये देईन. शेटजी पक्के मख्खीचूस आहेत हे ढेकू मार्लेला चांगलेच माहीत होते. त्याने हो म्हणून सांगितले. ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण झाला. मात्र, पैसे देण्यापूर्वी वीरेंद्रभाईने आपली खाट तपासून घेण्यास सुरुवात केली तेव्हा त्यात 5-6 ढेकूण त्यांना आढळले. ते म्हणाले, ‘अरे बाबा, यातील सर्व ढेकूण तर तू मारलेच नाहीत. यात आणखी काही शिल्लक आहेत.’  यावर ढेकू म्हणाला, ‘शेटजी, मी सर्व ढेकूण मारले आहेत. जे ढेकूण तुम्ही बघत आहात त्या यातील काही ढेकणांच्या विधवा पत्नी आहेत. त्यांना मारायचे असेल तर वेगळे पैसे द्यावे लागतील.’

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
7 + 9

तुमचे विचार(1)

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment