संपतराव, ही बाई चालू आहे

एक बाई संपतरावच्या दुकानात येतात. संपतराव मला एक बोलणारा पोपट पाहिजे...
संपतराव एक पोपट दाखवतात.
बाई - संपतराव मी या पोपटाला काही विचारु का ?
संपतराव - हो... हो... काहीही विचारा...
बाई - पोपटा मी कशी दिसते सांग बरं...
पोपट म्हणतो, संपतराव ही बाई चालू दिसते...
बाई - संपतराव हा पोपटतर भलतच काही तरी बोलत आहे. सरळ सरळ शिव्या देतो...
संपतरावने पोपटाला पकडले आणि पाण्यात बुडवले. आता देशील शिव्या...
पोपट - हो देईल... संपतरावने पुन्हा त्याला पाण्यात बुचकाळले.. आता देशील...
पोपट म्हणाला, हो देईल...
संपतरवाने पुन्हा पाण्यात बुडवले आणि विचारले, आता देशील शिव्या...
पोपट म्हणाला नाही देणार.
संपतराव त्या बाईला म्हणाले, बाई आता विचारा काय विचारायचे ते...
बाई - बरं एक सांग... मी माझ्या घरात एका माणसासोबत आले तर तु काय समजशील...
पोपट - तुम्ही तुमच्या पतीसोबत आल्या...
बाई - छान. जर मी दोन माणसांसोबत आले तर..
पोपट - तुम्ही तुमच्या पती आणि दीरासोबत आल्या.
बाई - व्वा... छान, जर तीन जणांसोबत आले...
पोपट - तर तुम्ही तुमच्या पती, दीर आणि भावासोबत आल्या आहात.
बाई - शब्बास, जर चार जणांसोबत आले तर...
पोपट - संपतराव पाणी घेऊन या... मी सांगत होतो ही बाई चालू आहे !!!





