ब्रिटनचे दोन क लाकार हीदर आणि इव्हॉन मॉरिसन यांनी थ्रीडी प्रिंटेड पतंग तयार केला आहे. हा घनाकृती पतंग चांगलाच वजनदार असला तरी वा-यावर सहज स्वार होतो. हा पतंग तयार करण्यासाठी थ्रीडी प्रिंटेड नायलॉन कनेक्टर्स, कार्बन फायबर रॉड्स, हँडमेड कंपोझिट फॅब्रिक आदी साहित्याचा वापर केला आहे.