Home » International » Other Country » A Sensational Breakthrough: The First Bionic Hand That Can Feel

स्पर्शाची अनुभूती देणारा कृत्रिम हात विकसित

वृत्तसंस्था | Feb 20, 2013, 12:44PM IST
स्पर्शाची अनुभूती देणारा कृत्रिम हात विकसित

बोस्टन - शास्त्रज्ञांनी एक कृत्रिम हात (बायोनिक हँड) तयार केला आहे. त्याचबरोबर स्पर्शाची अनुभूतीदेखील देईल. या शोधानंतर कृत्रिम अवयवांची नवीन पिढी विकसित होणार आहे. बोस्टन येथील एका कार्यक्रमात अमेरिकन अकॅडमी फॉर अँडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे डॉ. सिल्वेत्रो मिसेरो यांनी या संशोधनाचा दावा केला आहे. अपंग व्यक्तीचे आपल्या कृत्रिम हातावरील नियंत्रण यापुढे अधिकच वाढणार आहे.

बायोनिक हँड

बायोनिक हात रोबोटिक रचनेवर अवलंबून असेल. हातांना दोन इलेक्ट्रोडच्या साह्याने व्यक्तीच्या मज्जासंस्थेशी जोडण्यात येईल.

बायोनिकचे इलेक्ट्रोड मनगटाच्या वरील भागात लावलेले असतील. त्यामुळे विचारांनुसार हातांची हालचाल करणे शक्य होणार आहे.

हाताच्या त्वचेशी लागून असलेले सेन्सर वातावरणाचा अनुभव मेंदूपर्यंत पोहोचवण्याचे काम करतील.

असे करेल काम
बायोनिक हँड दोन इलेक्ट्रोडद्वारे मज्जासंस्थेशी जोडलेले असतील.

व्यक्तीला जेव्हा हात हलवण्याची इच्छा असेल तेव्हा मेंदूतील इलेक्ट्रोडने डिकोड होऊन छोट्या संगणकापर्यंत
पोहोचेल. संगणकाच्या सूचनेवर मोटरच्या साह्याने बोटांमध्ये हालचाल होईल.

बोटांनी किंवा अंगठय़ाने वस्तूंना उचलता येणे, थांबवणे शक्य आहे.
तळहात, फिंगरटिप्सच्या सेन्सरने वास्तवाचा अनुभव मिळेल.

Email Print
0
Comment