Home » International » Other Country » Afganistan's Malala Who Challege Taliban

तालिबानला आव्हान देणारी अफगाणिस्तानची ‘मलाला’

वृत्तसंस्था | Feb 23, 2013, 09:36AM IST
तालिबानला आव्हान देणारी अफगाणिस्तानची ‘मलाला’

कंदहार/ मुंबई - नवोदित ग्राफिटी चित्रकार मलीना सुलेमान दिसायला जेवढ्या सुंदर आहेत. तेवढ्याच आतून निर्भयी स्वभावाच्या आहेत. तालिबानचा निडरपणे मुकाबला करणा-या मलीना यांना अफगाणिस्तानची ‘मलाला’ म्हटले जाते.
तालिबानचा सामना करणे तितके सोपे नाही. तरीही मलीना यांनी मुकाबला केला; परंतु तालिबानकडून धमक्या वाढू लागल्या तेव्हा त्यांच्या वडिलांचे पाय तोडण्यात आले. त्यानंतर मलीना यांच्यावर देश सोडण्याची वेळ आली. देशातील उदारवादी आणि आधुनिक विचार करणा-या समाजाचे घटक असल्याचे त्या स्वत: ला मानतात. दोन महिन्यांपूर्वी आई-वडिलांसोबत कंदहारहून मुंबईत आलेल्या मलीना सध्या स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेऊ लागल्या आहेत. भारतात आल्यापासून त्या अतिशय आनंदी आहेत.

गुन्हा काय होता ? शहरातील भिंती, परिसरातील खडकांवर चित्र काढणे, मूर्ती तयार करणे हा मलीना सुलेमान यांचा गुन्हा होता. कलेतील त्यांची आवड तालिबानला आवडली नाही. मानवी मूर्ती किंवा माणसाचे चित्र काढणे धर्माला मान्य नसल्याचे तालिबानने सांगितले. तालिबानच्या विरोधाला न जुमानता मलीना यांनी आपले कलेचे प्रदर्शन सुरूच ठेवले; परंतु वडिलांवर हल्ला केल्यानंतर आम्हाला देश सोडून पळून यावे लागले, असे मलीना सांगतात.
लोकांनी दगड मारले : भिंती, खडकांवर चित्र काढण्याची माझी आवड लोकांना फारशी भावली नाही. कलेसाठी कराचीला गेले होते. तेथून परतल्यानंतर लोकांनी माझी खूप निंदा केली. घर बदलून पाहिले. तरीही असाच अनुभव होता. काहीवेळा माझ्यावर दगडफेकही झाली, असा विचित्र अनुभव मलीना यांनी सांगितला.
दीड वर्ष घरात : कलासक्त असलेल्या मलीना यांना तालिबानने चित्र काढण्यापासून रोखले. त्यासाठी धमकी देणारे लेखी पत्रदेखील पाठवले. त्यामुळे घरातील व्यक्तींनी भीतीपोटी मलीना यांना घराबाहेर जाण्यास विरोध केला. त्यांना घरातच दीड वर्ष राहावे लागले. मलिनाचा धाडसी स्वभावाबद्दल राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी आपल्या महालात निमंत्रण देऊन कौतुक केले होते.

भारतात शिक्षण
मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये मलीना शिक्षण घेत आहे. येथे मुले-मुली एकत्र राहून केवळ मित्र राहतात. ही गोष्ट खूप चांगली आहे. सध्या मी गोंधळात आहे. एकीकडे कुटुंबाची जबाबदारी आहे. दुसरीकडे तालिबानी धमकी. त्यामुळे कोठे जावे हा प्रश्न मलीनाने विचारला आहे. बीबीसी हिंदीशी बोलताना तिने मुंबईत काही काळ राहण्याचा मानसही व्यक्त केला.

Email Print
0
Comment