Home » International » Other Country » Afzal Guru Supporter Eropean Uninon

अफझल गुरू समर्थकांमध्‍ये युरोपियन युनियन ही

वृत्तसंस्था | Feb 14, 2013, 07:39AM IST
अफझल गुरू समर्थकांमध्‍ये युरोपियन युनियन ही

ब्रुसेल्स - संसद हल्ल्यातील दहशतवादी अफझल गुरूला फासावर चढवल्याबद्दल युरोपियन युनियनलाही (ईयू) अफझलचा कळवळा आला आहे. त्याला फासावर लटकवल्याबद्दल खेद व्यक्त करून भारताने मृत्युदंडाची शिक्षाच बंद केली पाहिजे, असे मत युनियनच्या परराष्ट्र विभागाच्या सचिव कॅथरिन अ‍ॅश्टन यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, अफझल गुरूच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी बुधवारी काश्मिरात वृत्तपत्रे प्रकाशित झाली.संसद हल्ल्यात निर्घृणपणे हत्या करण्यात आल्या. हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या निरपराध नागरिकांच्या कुटुंबीयांच्या व्यथांची जाणीव आहे. मात्र मृत्युदंडाच्या शिक्षेला युरोपियन युनियचा तत्त्वत: विरोध आहे. मग तो गुन्हा कसाही असो, असे अ‍ॅश्टन म्हणाल्या.

संचारबंदी शिथिल : जम्मू-काश्मिरात बुधवारी संचारबंदी शिथिल करण्यात आली. श्रीनगरमधील निगीन, लाल बाजार, झकुरा येथे काही काळ तर राम मुंशी बाग, कोठीबाग, सदर, राजबाग, शेरग्रही आदी भागांत पूर्णपणे शिथिल करण्यात आली. संचारबंदी शिथिल होताच नागरिकांनी खाण्या-पिण्याचे सामान, भाजीपाला, औषधी घेण्यासाठी दुकानांवर गर्दी केली होती. बुधवारी वृत्तपत्रेही प्रकाशित करण्यात आली. संचारबंदीच्या काळात फिरण्यासाठी प्रसारमाध्यमांना सवलतीचे पासेस देण्यात आले नव्हते त्यामुळे वृत्तपत्रेही बंद होती. मात्र वृत्तपत्रे प्रकाशित करण्यास बंदी नव्हती, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले. वृत्तपत्रे सुरळीत सुरू झाली असली तरीही के बलवरील वृत्तवाहिन्या आणि इंटरनेट, मोबाइल सेवा अद्याप बंदच आहे.

Email Print
0
Comment