जाहिरात
 
 
 

..तर तू या जगात राहशील का?

 
Source: डीबी स्टार   |   Last Updated 07:45(21/02/12)
 
 
 

जुन्या काळातील गोष्ट आहे. एक राजकुमार लोकांसोबत अत्यंत निदर्यपणे वागायचा. त्याच्या या वागणुकीमुळे प्रजा त्रस्त झाली होती. राजेशाहीमध्ये राजा शक्तिशाली असतो. राजकुमार करत असलेल्या अत्याचाराच्या तक्रारी महाराजांपर्यंत पोहोचल्या. राजकुमार महाराजांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे महाराज धर्मसंकटात सापडले. त्याला दंड कसा करायचा? रक्ताचे नाते अडथळा निर्माण करत होते. तो असे मानणार नाही आणि वठणीवरही येणार नाही. माझे संन्यासी गुरू नक्कीच त्याला वठणीवर आणतील, असा विचार महाराजांनी केला.

याच विचाराने महाराज गुरूंकडे गेले आणि नमस्कार करून म्हणाले, ‘महाराज, माझ्या मुलाला एक अत्यंत वाईट सवय आहे. तो इतरांसोबत अत्यंत निर्दयीपणे वागतो. तुम्हीच त्याला समजावून सांगा. इतरांनी सांगितल्यास तो ऐकणार नाही.’ संन्याशाने महाराजांना आश्वासन दिले आणि एक योजना आखली. संन्यासी महाराजांसोबत जंगलात गेले. राजकुमार आणि इतर सुरक्षारक्षकही त्यांच्यासोबत होते. वाटेत एक कडुलिंबाचे झाड आले. संन्यासी त्या झाडाकडे बोट दाखवत म्हणाले, ‘त्या झाडाची 10 ते 20 पाने तोडून आणा.’ त्यांच्या आ™ोचे पालन झाले. संन्याशाने पाने हातात घेतली राजकुमाराला देत म्हणाले, ‘राजकुमार, ही पाने तुम्ही खा.’ राजकुमाराने लिंबाची पाने तोंडात टाकून चावायला सुरुवात केली तेव्हा त्याचे तोंड कडू झाले. राजकुमाराला खूप वाईट वाटले; परंतु गुरूंचा आदेश होता त्यामुळे तो काहीच करू शकला नाही.

दुसर्‍या दिवशीही तोच क्रम पुन्हा योजनाबद्धरीत्या चालला. सर्वजण जंगलात त्याच जागेवर बसले. संन्यासी म्हणाला, ‘काल हेच झाड होते आणि याच झाडाची पाने राजकुमाराने चाखली होती. आज ते झाड दिसत नाही.’ राजकुमार म्हणाला, ‘गुरुदेव, ते झाड मीच तोडायला सांगितले होते.’ संन्यासी म्हणाला, ‘का?’ राजकुमार म्हणाला, ‘ते झाड खूप कडू होते. अशा झाडाचे काय काम? त्यामुळे मी तोडण्यास सांगितले.’ संन्यासी म्हणाला, ‘चांगले केले, अशा प्रकारची कडू वस्तू या जगात राहायलाच नको. तुझी वागणूकही कडू आहे. प्रजेच्या दृष्टीने तूसुद्धा कडू आहेस. कडू वस्तू या जगात राहायलाच नको, असे जर प्रजेने ठरवले तर तू या जगात राहशील का?’

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
4 + 8

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment