Home » International » Pakistan » Ashraf Said Kill To Every Terrorist In Queta

क्वेट्टामधील दहशतवाद्यांना शोधून मारा - पंतप्रधान राजा अश्रफ

वृत्तसंस्था | Feb 20, 2013, 16:02PM IST
क्वेट्टामधील दहशतवाद्यांना शोधून मारा - पंतप्रधान राजा अश्रफ

इस्लामाबाद - क्वेट्टा येथे मृतदेह सोबत घेऊन निदर्शने करत असलेल्या शिया मुस्लिमांपुढे पाकिस्तान सरकार पुन्हा एकदा झुकले आहे. शिया मुस्लिमांची मागणी मान्य करत पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांनी आदेश दिला आहे की, क्वेट्टा येथील दहशतवाद्यांना शोधून ठार करा. दरम्यान, लष्कर-ए-झांगवी या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. याशिवाय संशयास्पदरित्या आढळून आलेल्या १७० जणांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

बलुचिस्थानचे गृहसचिव अकबर हुसैन दुर्रानी म्हणाले, संरक्षण दलातील जवानांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-झांगवीचा प्रमुख वली मुहम्मद ठार झाला आहे. जानेवारीमध्ये आलमदार येथे झालेला बॉम्ब स्फोट आणि संरक्षण दलातील एका शियापंथीय उच्चाधिका-याच्या हत्येचा तो मास्टरमाईंड होता. या संघटनचे आणखी तीन दहशतवादी मारले गेले आहेत.

पाकिस्तानच्या १८ कोटी लोकसंख्येत केवळ २० टक्के शियापंथीय आहेत. शनिवारी क्वेटा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ८५ शिया मुस्लिम मारले गेले होते. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-झांगवीने स्विकारली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालाने शिया मुस्लिमांच्या हत्येप्रकरणी संरक्षण आणि गृहसचिवांना फटकारले होते.

Email Print
0
Comment