जाहिरात
Home » International » Other Country » Bad Spot On Egypt's Tahrir

इजिप्तच्या ‘तहरीर’वर बदनामीचा डाग

वृत्तसंस्था | Feb 18, 2013, 08:23AM IST
इजिप्तच्या ‘तहरीर’वर बदनामीचा डाग

कैरो- जगाला क्रांतीचा संदेश देणा-या  इजिप्तच्या तहरीर चौकाची अब्रू वेशीवर टांगली आहे. तंग कपडे परिधान केल्यावरून डझनभर तरुणांचे टोळके चौकातून जाणा-या  तरुणींची छेडछाड करत असल्याचे देशातील वास्तव जगासमोर आले आहे. मुलींना जबरदस्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारे फुटेज इंटरनेटवर पाहायला मिळत आहे.  

शौरोक अल अतर या 24 वर्षीय तरुणीची ही आपबीती आहे. तहरीर चौकात ज्या भागात आपण राहतो त्याच भागात ही घटना घडली आहे. आता घराबाहेर पडणेही असुरक्षित वाटू लागले आहे. तीन-चार दिवसांपासून मी घरातून बाहेर पडले नाही. घरात एकटीच राहिले.हा प्रसंग आठवल्यामुळे मला मनातून खूप वेदना होत आहेत. इजिप्तमध्ये क्रांतीचे प्रतीक मानल्या जाणा-या  ठिकाणीच देशातील अस्थिर वातावरणाचा परिणाम महिलांवर होत आहे. त्यामुळे या मुद्द्याला गांभीर्याने घेतले जात आहे.

काय आहे प्रकरण? : इजिप्तमधील अनेक महिलांना तरुणांकडून होणा-या  छेडछाडीला सामोर जावे लागत आहे. तहरीर चौकात जानेवारी महिन्यात एकाच दिवसात 22 प्रकरणे उजेडात आली आहेत. या तक्रारींची पोलिस ठाण्यात नोंद आहे. तंग कपडे परिधान करू नका, असा मानणारा एक कडवा वर्ग अशा प्रकारच्या घटनांना प्रोत्साहन देत आहे.
आरोप फेटाळला : तहरीर चौकात तरुणींना किंवा महिलांना छेडण्यासाठी आम्ही गेलो नव्हतो, असा दावा करून लोकांनी आरोप फेटाळून लावला आहे. तरुणींची छेड काढली तर त्यात फारसे काही चूक केले नाही, छेड काढली जाऊ नये, असे वाटत असेल तर महिलांनी तंग कपडे परिधान करू नये, असा कट्टरवादी सल्लाही अनेकांनी दिला.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
7 + 3

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment