सिडनी - ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध खाण कंपनी रियो टिंटोने सर्वात मोठा दुर्मिळ गुलाबी हिरा शोधण्यात यश आल्याचा दावा केला आहे. हा हिरा 12.76 कॅरेटचा असून तो ऑस्ट्रेलियात आढळल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. ‘अरगाइल पिंक ज्युबली’ असे या हि-याचे नाव असून तो ऑस्ट्रेलियातील किम्बर्ली भागात सापडला आहे. या हि-याची अंदाजित किंमत एक कोटी डॉलर (49.22 कोटी रुपये) इतकी निर्धारित करण्यात आली आहे. कंपनीने म्हटले आहे की, हा हिरा कापून त्याचे पॉलिश करणे व इतर प्रक्रियेसाठी आणखी 10 दिवसांचा कालावधी लागणार आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून या हि-याचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. हा एक अद्भूत व अद्वितीय हिरा आहे. तो शोधून बाहेर काढण्यासाठी आम्हाला 26 वर्षे लागली. अशा प्रकारचा दुसरा हिरा मिळणे जवळपास अशक्य आहे, असाही दावा कंपनीने केला आहे. या हि-याचा लिलाव पुढील महिन्यात निमंत्रित व्यक्तींच्या उपस्थितीत होण्याची शक्यता आहे.