Home » International » Bhaskar Gyan » Black Tea Heathy For Heart Patient

ब्लॅक टी प्यायल्याने हृदयाचे संरक्षण

वृत्तसंस्‍था | Jan 10, 2013, 01:00AM IST
ब्लॅक टी प्यायल्याने हृदयाचे संरक्षण

मेलबर्न - ब्लॅक टी प्यायल्याने हृदयरोग होण्याची शक्यता कमी होऊ शकते, असा दावा नव्या अभ्यासात करण्यात आला आहे. ब्लॅक टीमध्ये आढळणारी संयुगे हृदयरोग टाळण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. ब्लॅक टीमधील फ्लाओनाइड क्युरेसिटीन घटक ऑक्सिडंटमुळे रक्तवाहिन्यांचे होणारे नुकसान कमी करू शकतो. उंदरांच्या रक्तवाहिन्यांमध्ये यावर प्राथमिक अभ्यास केला आहे, अशी माहिती वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीचे प्रो. डॉ. नातली वॉर्ड यांनी दिली. बायलॉजिकल फार्मालॉजी जर्नलमध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Email Print
0
Comment